Kagawad

कागवाडमध्ये चन्नम्मा पुतळा पुतळा उभारणीसाठी ५ लाखाचा निधी : आ. श्रीमंत पाटील

Share

कागवाड येथे राणी चन्नम्मा यांचा पुतळा उभारण्यात येणार असून सदर पुतळा उभारणीसाठी वैयक्तिक पातळीवर ५ लाख रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा, आमदार श्रीमंत पाटील यांनी केली. मंगळवारी झालेल्या राज्योत्सवाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

कागवाड मध्ये राज्योत्सव दिनानिमित्त विविध मान्यवरांच्या उपस्थितीत राज्योत्सवानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भव्य मिरवणुकीचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कागवाड येथे राणी चन्नम्मा यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आमदार श्रीमंत पाटील यांनी सांगितले. पुतळा उभारणीसाठी आपण ५ लाख रुपयांचा वैयक्तिक निधी देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कागवाड जय कर्नाटक करवे अध्यक्ष बसवराज मगदूम यांनी आमदार श्रीमंत पाटील यांनी जाहीर केलेल्या देणगीबद्दल त्यांचे कौतुक करून कागवाड वासियांच्यावतीने त्यांचे आभार मानले.

यावेळी करवे अध्यक्ष सिद्दू वडेयर, शिवानंद नवीन्नाळ, महावीर पाटील, राजू मगदूम, नेमिनाथ चौगुले, ज्योतीकुमार पाटील, काका पाटील, राजगौडा पाटील, प्रवीण पाटील, फारूक अलास्कार, महांतेश बडिगेर, बंडू नेमगौडार आदींसह शेकडो कन्नड अभिमानी कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Tags:

kagawad shrimant patil