पुनीत राजकुमार यांच्या अकाली जाण्याने त्यांचे तमाम चाहते शोकसागरात बुडाले आहेत. त्यांच्या आठवणी आजही त्यांच्या चाहत्यांच्या हृदयात जिवंत असून त्यांनी केलेले कार्य हे कौतुकास्पद असल्याचे मत खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी व्यक्त केले. चिकोडी येथे पुनीत राजकुमार यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर ते बोलत होते.

चिकोडी येथे कन्नड संघटना आणि एम के कवटगीमठ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाटक रत्न डॉ. पुनीत राजकुमार यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. चिकोडी शहरात कित्तूर राणी चन्नम्मा पुतळा देखील लवकरच निर्माण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ म्हणाले की, पुनीत राजकुमार यांनी सामाजिक कार्यातून लोकांची मने जिंकली. अल्पावधीत शेकडो समाजोपयोगी कामे केली असून त्यांनी गरीब, दलितांचा आवाज म्हणून आदर्श जीवन जगले. त्यांनी केलेले कार्य हे प्रत्येकाच्या स्मरणात राहील, असे कवटगीमठ म्हणाले.
सहकार नेते जगदीश कवटगीमठ यांनी पुनीत राजकुमार यांच्या कार्याचे स्मरण करत त्यांनी आपल्या आयुष्यात केलेल्या कार्यातून तरुणाईला प्रेरणा मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

अल्लमप्रभू स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात पार पडलेल्या या कार्यक्रमात चरमूर्तीमठाचे संपादन स्वामीजी, काशिनाथ कुरणी, संजू बडिगेर, रमेश करनुरे, नागेश माळी, चंद्रकांत हुक्केरी, महेश भाते, नगरपालिका उपाध्यक्ष संजय कवटगीमठ, नगरपालिका सदस्य नागराज मेदार, विश्वनाथ कामगौड, संतोष टवळे, प्रशांत काळिंगे, सिद्दप्पा डांगेर, विना कवटगीमठ, अशोक हरगापुरे, संजय अर्गे, सतीश नूली, सागर बीस्कोप्प आदी उपस्थित होते.


Recent Comments