67 व्या कर्नाटक राज्योत्सवानिमित्त आज चिकोडी येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत, भव्य मिरवणुकीसह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


चिकोडी तालुका प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार गणेश हुककेरी, खासदार अण्णासाहेब जोल्ले, नगरपालिका अध्यक्ष प्रवीण कांबळे, उपाध्यक्ष संजय कवटगीमठ, उपविभागाधिकारी संतोष कामगौड, तहसीलदार सी एस कुलकर्णी, नगरपालिका सदस्य, तालुका प्रशासन अधिकारी आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भुवनेश्वरी देवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यानंतर आकर्षक सजावट करण्यात आलेल्या वाहनातून भुवनेश्वरी देवीच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.

आमदार गणेश हुक्केरी, खासदार अण्णासाहेब जोले यांच्या हस्ते पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. चिकोडी परिसरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक मार्गस्थ झाली. या मिरवणुकीत कित्तूर राणी चन्नम्मा, संगोळी रायण्णा, वंकी ओबव्वा, बेळवडी मल्लम्मा आदींच्या वेशभूषेत तरुणींनी सहभाग घेतला. याचप्रमाणे सांस्कृतिक पथक, कला पथक आणि वाद्यवृंदांचीही मिरवणुकीत उपस्थिती होती. या मिरवणुकीत कर्नाटकातील ऐतिहासिक स्थळांचा देखावा दर्शविणारे चित्ररथ देखील सामील झाले होते. विविध प्रसिद्ध कन्नड गीतांवर या मिरवणुकीत तरुणाईने ठेका धरला होता.


Recent Comments