१ नोव्हेंबर रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या राज्योत्सव दिनाच्या कार्यक्रमात उत्साहाने सर्व कर्नाटकवासीय सामील होतात. हा उत्साह अधिक द्विगुणित होणे गरजेचे असून या पार्श्वभूमीवर बेळगावमधील राज्योत्सवासंदर्भात सरकारने चिंतन करण्याची आवश्यकता आहे, असे मत केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.
बेळगावमध्ये आज ६७ वा कर्नाटक राज्योत्सव साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. दरवर्षीप्रमाणेच यंदाही मोठ्या जल्लोषात राज्योत्सव साजरा केला जात असून बेळगावमध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या राज्योत्सवासाठी सरकारने अधिक प्रोत्साहन द्यावे, हा राज्योत्सव राज्यस्तरीय उत्सव व्हावा, या दृष्टिकोनातून विचार व्हावा, कन्नडच्या संवर्धनासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.


Recent Comments