अथणी तालुका प्रशासनाच्या वतीने ६७ वा कर्नाटक राज्योत्सव दिन भव्य उत्साहात साजरा करण्यात आला. भोजराज क्रीडांगणात राज्योत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अथणी परिसरात आमदार महेश कुमठळ्ळी यांच्या नेतृत्वाखाली विविध विभागाचे अधिकारी आणि मान्यवर कार्यक्रमात सहभागी झाले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अथणीचे आमदार महेश कुमठळ्ळी हे होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, देशात १८०० हुन अधिक जाती आहेत परंतु आपण सर्व एक आहोत यावर प्रत्येकाने विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या भाषेसह इतर भाषांचाही आदर करता आला पाहिजे. अनेक साहित्यिक – लेखकांनी कन्नड भाषा जोपासली असून भविष्यात कन्नड भाषेच्या संवर्धनासाठी आपल्या मुलांना कन्नड शाळेत शिकविण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि आपण दोघांनी मिळून केलेल्या विकासकामांचीही त्यांनी माहिती दिली. शिवाय अथणी मतदार संघात शांतता राखण्यासाठी प्रत्येकाने एकसंघ राहून काम करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
तहसीलदार सुरेश मुंजे यांनी तालुका प्रशासनाच्यावतीने आखण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसंदर्भात यावेळी सूचना दिल्या.
यावेळी डीवायएसपी श्रीफा जलदे, नगरपालिका मुख्य अधिकारी इराण्णा दड्डी, शेखर करबसप्पगोळ. जे एम हिरेमठ, इराण्णा वाली, महादेव बिरादार, के टी कांबळे, उदयगौंडा पाटील, बसगौडा पाटील, कल्लेश मड्डी आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.


Recent Comments