तब्बल ३-४ वर्षानंतर झालेल्या विजापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून, त्रिशंकू मनपा अस्तित्वात आली आहे. बहुमतासाठी भाजपला एका जागेची गरज आहे.
एकूण 35 प्रभागांसाठी ही निवडणूक झाली. त्याचा निकाल त्रिशंकू आला आहे. कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. तथापि भाजप सहज सत्ता काबीज करेल अशी शक्यता आहे. कारण सत्ता मिळविण्यासाठी भाजपला केवळ एका जागेची कमतरता आहे. महापालिका भाजपच्या ताब्यात जाणार हे नक्की आहे.
भाजपमधून बाहेर पडलेल्या काहींना मोठा झटका बसला आहे. एमआयएमने २ जागा मिळवत नव्याने खाते खोलले आहे.
एकूण पक्षीय बलाबल असे :
भाजप – 17 प्रभागात विजय
काँग्रेस – 10 जागांवर विजय
जेडीएस – 01 जागेवर समाधानी
एमआयएम 02 जागांवर खाते खोलले.
Vijayapura
विजापूर मनपा त्रिशंकू; बहुमतासाठी भाजपला एका जागेची गरज


Recent Comments