Belagavi

काळा दिन, सायकल फेरी यशस्वी करा : दीपक दळवी यांचे आवाहन

Share

केंद्र सरकारने मराठीबहुल सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ सीमाभागातील मराठी माणूस महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली गेली ६५ वर्षे अखंडपणे लढा देत आहे. सीमाप्रश्नी दाखल झालेल्या खटल्याची सुप्रीम कोर्टात येत्या २३ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जाण्याची आपली प्रबळ लोकेच्छा दाखवून देण्यासाठी उद्या १ नोव्हेंबरचा काळा दिन आणि सायकल फेरीत हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन निषेध कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी पत्रकारांशी बोलताना सीमावासीयांना केले आहे.

Tags:

mes belgaum black day