Crime

अनैतिक संबंधातून खानापुरात एकाचा निर्घृण खून

Share

अनैतिक संबंधातून एकाचा चाकूचे सपासप वार करून निर्घृण खान केल्याची घटना काल मध्यरात्री बाराच्या सुमारास खानापूर शहराच्या मध्यभागी असलेल्या आश्रय कॉलनीत घडली आहे. या थरारक घटनेने खानापूर शहरात एकच खळबळ माजली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मारुती गणपती जाधव (वय 42) याचा शेजारी प्रशांत दत्ता नार्वेकर याने खून केला असल्याची माहिती आहे. मारुती जाधव हा जेवण करून घरासमोरून फिरत असताना अचानक प्रशांतने येऊन त्याच्यावर चाकूने चार वार केले. पोटावर आणि मानेवर धारदार चाकूने वार केल्याने मारुती रक्ताच्या थारोळ्यात कोसळून मरण पावला. मारुतीने आपल्यावर हल्ला केल्याचे भासविण्यासाठी प्रशांतने सोबत आणलेली कुऱ्हाड व तलवार मारुतीच्या हातात ठेवली व तो तिथेच बसून राहिला. घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन प्रशांतला ताब्यात घेतले. बैलहोंगल उपविभागाचे डीवायएसपी शिवानंद कटगी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा पोलिसांचा कयास आहे. खानापूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु ठेवला आहे.

Tags:

khanapur murder today