बीआरडीएस आणि मेट्रोकास्ट नेटवर्क इंडिया प्रा. लि. चे प्रमुख नागेश छाब्रिया यांच्या हस्ते आज बेळगावात आयोजित टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन केले.
कै. सुमन कृष्णराव बिरंजे यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र संजय बिरंजे यांच्या नेतृत्वाखाली बालाजी टेबल टेनिस अकादमीतर्फे टिळकवाडी येथील सामर्थ्य मंदिर हॉल येथे टेबल टेनिस स्पर्धा भरविण्यात आली आहे. आज रविवारी बीआरडीएसचे प्रमुख नागेश छाब्रिया यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना नागेश छाब्रिया म्हणाले की, टेबल टेनिस हा एक चांगला खेळ आहे. यामुळे आपले शरीर फिट राहते. मीसुद्धा टेबल टेनिस खेळाडू आहे. आम्ही तुम्हाला शक्य ती सर्वप्रकारची मदत करू. सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी करावी असे आवाहन करून त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या नंतर बोलताना आयोजक संजय बिरंजे म्हणाले, आम्ही आमच्या आईच्या स्मरणार्थ टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन केले. आम्ही दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करतो. यातून आमच्या बेळगावच्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी सामर्थ्य मंदिरचे सचिव विवेक तिनेकर, हेस्कॉम एईई संजय हमण्णावर, महेश अनगोळकर, सूरज चिंचोळीमठ अतिथी म्हणून उपस्थित होते. विपुल चौगुले व संतोष भूकटे प्रमुख पंच म्हणून उपस्थित होते. या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, हल्याळ, गोवा, बेळगाव येथील 60 हून अधिक टेबल टेनिसपटूंनी सहभाग घेतला आहे. 250 सामने खेळवण्यात येणार आहे. आमच्या इन न्यूज-आपली मराठीकडून सर्व खेळाडूंना शुभेच्छा.
Recent Comments