Khanapur

नगरसेवक लक्ष्मण मादार यांच्या प्रयत्नाने पाणी समस्या दूर

Share

खानापूर नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या आदर्श कॉलनीमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याची समस्या होती. याची गंभीर दखल घेत माजी स्थायी समिती सदस्य लक्ष्मण मादार यांनी कूपनलिका खोदून पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला.

होय, खानापूर शहरातील आदर्श कॉलनीमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याची मोठी समस्या उदभवली होती. त्यामुळे रहिवाशांचे विशेषतः महिला वर्गाचे मोठे हाल होत होते. याची गंभीर दखल घेत माजी स्थायी समिती सदस्य लक्ष्मण मादार यांनी कूपनलिका खोदून पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. कूपनलिका खोदून पाण्याची व्यवस्था केल्याबद्दल रहिवाशांतर्फे लक्ष्मण मादार यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी नगरसेवक दीपक पवार, सचिन साळगावकर, अरुण सरदेसाई आदी उपस्थित होते.

Tags:

khanapur corporator laxman madar satkar