कागवाड शहरातील अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती समाजातील 150 कुटुंबांसाठी सरकारने यापूर्वी दिलेल्या 60 एकर जमिनीसाठी एससीपी-टीएसपी योजनेअंतर्गत 80 लाख रुपये अनुदान आमदार श्रीमंत पाटील यांनी मंजूर करून सिंचन योजनेसाठी कुदळपूजन करून कामाला चालना दिली.

शनिवारी आमदार श्रीमंत पाटील यांच्या हस्ते मुख्य अभियंता एम. एस. बिळगी यांच्या उपस्थितीत कागवाड येथील लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कामाला चालना देण्यात आली. अभियंता एम. एस. बिळगी यांनी आमदार श्रीमंत पाटील यांना प्रकल्पाची तांत्रिक माहिती दिली. 60 एकर शेतात सिंचनासाठी 40 लाख अनुदान पूर्वी मंजूर होऊन कामाला सुरुवात झाली आहे. उर्वरित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणखी 40 लाखांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. येत्या महिनाभरात हे काम पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.

आमदार श्रीमंत पाटील म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी येथील दलितांना शेतजमिनी देण्यात आल्या होत्या. मात्र, पाणीपुरवठ्याअभावी त्या कोरड्या पडल्या होत्या. येथील सिंचन योजनेसाठी पूर्वी 40 लाख अनुदान मंजूर झाले असून आता आणखी 40 लाख रु. अनुदान मंजूर केले. येत्या महिनाभरात हे काम पूर्ण होईल. सुमारे 150 कुटुंबे शेती करून आपला उदरनिर्वाह करू शकतात. तसेच मतदारसंघातील १९ गावांतील प्रकल्प मंजूर करण्यासाठी पाटबंधारेमंत्र्यांकडे अर्ज केला आहे. लवकरच त्या कुटुंबांनाही सरकारी योजनेचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दलित युवा नेते दयानंद कांबळे म्हणाले, आंबेडकर महामंडळ व समाजकल्याण विभागाच्या अनुदानातून ९९% काम झालेला कागवाड मतदार संघ हा राज्यातील एकमेव मतदारसंघ आहे. मतदारसंघातील सर्व गावांमध्ये एससीपी/टीएसपी योजनेंतर्गत कामे हाती घेण्यात आली आहेत. आमदार श्रीमंत पाटील दलित समाजाच्या कल्याणासाठी प्रयत्नशील असून आता सर्व समाजाला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी उभा राहील, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला दलित नेते बाळू कांबळे, दीपक कांबळे, दयानंद कांबळे, पाटबंधारे विभागाचे अधिकारी एम. एस. बिळगी, नानासाहेब अवताडे, एम. बी. पाटील, विठ्ठल पवार, ईश्वर कुंबार, रवी पाटील आदी दलित नेते व महिला शेतकरी उपस्थित होते.


Recent Comments