Belagavi

विकास हाच माझा मुख्य मंत्र : आ. लक्ष्मी हेब्बाळकर

Share

आमदार झाल्यापासून मी विकास हाच माझा मुख्य मंत्र बनवला आहे. सर्वसमावेशक विकासकामांना मी प्रथम प्राधान्य देत आहे, असे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगाव ग्रामीण मतदार संघातील सुळगा (येळ्ळूर) गावात आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमात सहभागी होऊन गावातील विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी गावातील महिला मंडळाच्या वतीने आ. हेब्बाळकर यांचा सत्कार करण्यात आला. यांच्याहस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.

“तुम्ही तुमच्या प्रेम, प्रोत्साहन आणि आशीर्वादाने मला तुमची सेवा करण्याची संधी दिली आहे, त्यामुळे मी कधीही डगमगणार नाही,” असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम, रूपा पाटील, लक्ष्मी लोहार, यमुना पाटील, लक्ष्मी पाटील, भारती पाटील, रेखा यादव, पद्मा पाटील, ज्योती टक्केकर, सुरेखा पाटील, धनश्री पाटील, गायत्री बस्तवाडकर, अनिता कुकडोळकर, रेखा पाटील लक्ष्मी कुकडोळकर, मिलन कंग्राळकर, कविता लोहार, रेणुका पाटील, नेहा पाटील तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक आदी उपस्थित होते.

Tags:

belgaum laxmi hebbalkar laxmi hebbalkar