Crime

विजापुरात आईच्या प्रियकराची 3 मुलांकडून निर्घृण हत्या; आरोपींना कोल्हापुरातून अटक

Share

आपल्या आईसोबत अनैतिक संबंध ठेवलेल्या एका व्यक्तीची 3 मुलांनी मिळून निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना विजापूर जिल्ह्यातील चडचण येथे शुक्रवारी घडली.

60 वर्षीय तुकाराम चव्हाण असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 60 वर्षीय तुकाराम आणि 45 वर्षीय तंगेव्वा बंगारतळी यांचे दहा वर्षांपासून अनैतिक संबंध होते. काल, शुक्रवारी घराच्या मागे आई तंगेव्वासह झोपलेल्या अवस्थेत तुकारामला पाहून तंगेव्वाची मुले सदाशिव बंगारतळी, चिक्कू बंगारतळी, आणि सिद्दू बंगारतळी यांचा पारा चढला. त्यांनी तुकारामाला पकडून बेदम मारहाण करून तीक्ष्ण हत्याराने त्याच्या डोक्यावर व अन्यत्र वार करून तुकारामची हत्या केली.

त्यानंतर तेथून पळ काढला. सदाशिव बंगारतळी, चिक्कू बंगारतळी, आणि सिद्दू बंगारतळी यांनी खुनानंतर महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे आश्रय घेतला होता. पोलिसांनी जाळे रचून त्यांना शिताफीने अटक केली आहे. याप्रकरणी चडचण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: