Chikkodi

सुंदर समाज निर्मितीसाठी श्रीशैल जगद्गुरू पदयात्रा : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी

Share

जनजागृतीसह स्वच्छ आणि सुंदर समाज निर्माण करण्यासाठी श्रीशैल जगद्गुरू यांनी पदयात्रेचे आयोजन केले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले.

चिकोडी तालुक्यातील येडूर या गावात श्रीशैल जगद्गुरू पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना प्रल्हाद जोशी म्हणाले, श्रीशैल जगद्गुरूंनी येडूर ते श्रीशैल पर्यंत पदयात्रेचे आयोजन केले असून या पदयात्रेच्या माध्यमातून सामाजिक जनजागृती करण्याचा त्यांचा उद्देश आहे. याचप्रमाणे स्वच्छ आणि सुंदर समाज निर्मिती, धर्म जागृती, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्याचा त्यांचा उत्तम संकल्प आहे. या पदयात्रेसंदर्भात पंतप्रधानांनीही कौतुक व्यक्त केल्याचे ते म्हणाले.

यावेळी बोलताना मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, येडूर ते श्रीशैल अशा पदयात्रेत धर्म, सामाजिक संदेश यासारख्या अनेक गोष्टींवर जनजागृती करण्यात येणार असून श्रीशैल जगद्गुरू यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्या म्हणाल्या.

याचप्रमाणे काशी येथील नूतन जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य, श्रीशैल जगद्गुरू, डॉ. चन्नसिद्दराम पंडिताराध्य स्वामी, निडसोशी पंचमलिंगेश्वर स्वामी, हुक्केरी चंद्रशेखर स्वामी, विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, के एल इ संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, आमदार ए एस पाटील नडहळ्ळी, श्रीशैल आमदार चक्रपान रेड्डी, व्हीआर एल प्रमुख विजय संकेश्वर यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले, वि प सदस्य हनुमंत निराणी, आमदार दुर्योधन ऐहोळे, माजी वि प सदस्य महांतेश कवटगीमठ, महाराष्ट्राचे कवटगीमठ, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री सिद्राम मेत्री, चिंचली येथील अल्लमप्रभू स्वामीजी, रघु सारंग श्री, नागसनूर, शहापूर, जैनापूर, देवरहिप्परगी, मांजरी, जानहट्टी, जमखंडी, गुळेदगुड्ड, अंतापूर, अंबिकानगर, नूल, एक्कंची, बारशी, मद्रूप, मसबिनाळ, बागेवाडी, इंगळेश्वर येथील स्वामी उपस्थित होते

Tags:

shrishailjagdguru-kashi-padyatra/