हलगा स्पोर्टस क्लबच्या वतीने दीपावलीनिमित्त भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजप बेळगाव ग्रामीण मंडळचे अध्यक्ष धनंजय जाधव उपस्थित होते. 70 स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला.

हलगा स्पोर्ट्स क्लबतर्फे दिवाळीनिमित्त भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 70 स्पर्धकांनी सहभाग घेऊन त्यांच्या अप्रतिम कलाविष्कारातून एकाहून एक सरस किल्ले बनवले. किल्ल्यांच्या या भव्य प्रतिकृतींचे गावकऱ्यांनी कौतुक केले. या कार्यक्रमास भाजपा ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव यांच्यासह इतर मान्यवर, ग्रामस्थ व हलगा स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments