Banglore

दिवाळी भेटीसोबत पैसे; मुख्यमंत्र्यांच्या चौकशीसाठी काँग्रेसचं ट्विट…!!!

Share

दिवाळीच्या काळात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या कार्यालयाने निवडक पत्रकारांना मिठाईच्या बॉक्ससह पैसे दिल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने दिलेली अडीच लाख रुपयांची लाच रक्कम काहींनी परत करून पत्रकारितेचा धर्म पाळल्याबद्दल कर्नाटक काँग्रेसने पत्रकारांचं अभिनंदन केलय. पत्रकारांना पैसे का दिले? या प्रश्नाचे उत्तर खुद्द मुख्यमंत्री बोम्मई यांनीच द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
पत्रकारांना भेटवस्तू म्हणून दिलेले पैसे आले कुठून? सरकारच्या खात्यातून, भाजप पक्षाकडून, मुख्यमंत्र्यांकडून वैयक्तिकरित्या की 40 टक्के कमिशनचा हा पैसा आहे, याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली.

Tags:

/congress-against-cm-bommaiah/