मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज मल्लेश्वरम सरकारी हायस्कूलमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि इंडियन टेक्नॉलॉजी काँग्रेस असोसिएशनने उभारलेल्या पुनीत सॅटेलाइट वर्क स्टेशनचे उद्घाटन केले.

लाखो कन्नड चित्रपट रसिकांच्या गळ्यातील ताईत, कन्नड चित्रपट अभिनेता अप्पू उर्फ पुनीत राजकुमार यांच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त बेंगळूरच्या मल्लेश्वरममधील सरकारी हायस्कूलमध्ये पुनीत सॅटेलाइट वर्क स्टेशनची उभारणी करण्यात आली आहे. त्याचे उदघाटन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते आज करण्यात आले. यावेळी आयटी, बीटी आणि विज्ञान व तंत्रज्ञान, उच्च शिक्षण व कौशल्य विकास मंत्री डॉ. सी.एन. अश्वत्थनारायण आदी मान्यवर सहभागी झाले होते.


Recent Comments