श्रीशैल जगद्गुरुंच्या येडूर ते श्रीशैलपर्यंत पदयात्रेनिमित्त नवीन काशी जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य स्वामीजींची नगर प्रवेश मिरवणूक चिक्कोडीत मोठ्या थाटात पार पडली.

काशीचे नवे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाध्याय शिवाचार्य स्वामीजींचे हजारो भाविकांनी पुष्पवृष्टी करून जल्लोषात स्वागत केले. त्यांची रथातून भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिला डोक्यावर जलकुंभ घेऊन सहभागी झाल्या होत्या. त्याचबरोबर ढोल-ताशा पथक, ध्वज, हत्ती, घोडा, नंदी, गायींचाही मिरवणुकीत सहभाग होता. यावेळी चिक्कोडी-सदलगाचे आमदार गणेश हुक्केरी मिरवणुकीत प्रारंभापासून उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्रापासून निघालेल्या निघालेली मिरवणूक जुन्या गावातून रुद्रपद बसवेश्वर मंदिर, चन्नम्मा चौक, वीरभद्रेश्वर मंदिर आणि काडसिद्धेश्वर मठात जाऊन विसर्जित झाली. काडसिद्धेश्वर मठात श्रीशैल जगद्गुरुंनी काशीचे नवे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य स्वामीजींचे स्वागत केले.

मिरवणुकीत जैनापूर स्वामीजी, बनहट्टी स्वामीजी, अंकुशदोड्डी स्वामीजी, गुरगुंटा स्वामीजी, आलुरा स्वामीजी, मलखेडा स्वामीजी, नूल स्वामीजी, शहापूर स्वामीजी, वैदिक शाळेचे विद्यार्थी, गावातील वडीलधारी व भक्तमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.


Recent Comments