बेळगाव तालुक्यातील पंत बाळेकुंद्री येथील पंत नगरमध्ये सुप्रसिद्ध कन्नड अभिनेते, दिवंगत पुनीत राजकुमार यांच्या पुण्यतिथीनिमित्त अन्नदान करण्यात आले.
पंत नगर येथील मित्रमंडळींनी आणि युवा वेदिकेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर पुनीत राजकुमार यांच्या स्मरणार्थ अन्नदान करण्यात आले.
यावेळी बेळगाव ता पं माजी अध्यक्ष शंकरगौडा पाटील, शरीफ सनदी, मलगौडा पाटील, मल्लिकार्जुन हेगनायक, करुणाकर शेट्टी, रवी उज्जनकोप्प, साईराम जंबगी, सागर कित्तूर, विजय सदारीयावर, शिवू कुंभार, सम्मद कागजी, राजी सिद्दण्णावर, राजेश दयन्नावार, सुरेश नाव, मदुस्वामी, सचिन मगदूम, विनायक नायक, श्रीपाल बेळकिंडी आदींसह अनेक पुनीत चाहते उपस्थित होते.


Recent Comments