बेळगावचे प्रांताधिकारी (असिस्टंट कमिशनर) रवींद्र करलिंगण्णावर यांची बदली झाली असून, त्यांच्याजागी बलराम चव्हाण यांनी नवीन एसी म्हणून पदभार स्वीकारला.
होय, नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले कनिष्ठ दर्जाचे केएएस अधिकारी बलराम चव्हाण यांची बेळगावचे एसी म्हणून बदली केल्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. प्रांताधिकारी रवींद्र करलिंगण्णावर यांच्या जागी बलराम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रवींद्र करलिंगण्णावर यांना अद्याप पोस्टिंग देण्यात आलेले नाही. आज शनिवारी, प्रांताधिकारी कार्यालयात मावळते प्रांताधिकारी रवींद्र करलिंगण्णावर यांनी नवीन प्रांताधिकारी बलराम चव्हाण यांच्याकडे अधिकार सुपूर्द केले. त्याचवेळी प्रांताधिकारी कार्यालयातील कर्मचारी व मान्यवरांनी मावळते प्रांताधिकारी रवींद्र करलिंगण्णावर यांचा सत्कार करून नवीन प्रांताधिकारी बलराम चव्हाण यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यानंतर बोलताना, मावळते प्रांताधिकारी रवींद्र करलिंगण्णावर म्हणाले, बदली ही अपेक्षितच असते. माझ्या सेवा काळात बेळगाव उपविभागातील सर्व अधिकारी व माझ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मला कुटुंबाप्रमाणे साथ दिली आहे. मी तुमचा सदैव ऋणी राहीन. तुम्ही रात्रंदिवस सेवा केली. नवीन प्रांताधिकाऱ्यांनाही असेच सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. बाइट
यावेळी बेळगावचे तहसीलदार आर. के. कुलकर्णी, खानापूरचे तहसीलदार प्रवीण जैन, सीपीआय गुदीगोप्प, बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रभू यत्नट्टी, ग्रेड-2 तहसीलदार अशोक मन्निकेरी, शिरस्तेदार बुडवण्णावर व प्रांताधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments