विजापूर महानगर पालिकेसाठी मतदान जोरात सुरू आहे. याचदरम्यान, मतदार यादीत नावे नसल्याने तहसीलदार आणि मतदारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याची घटना शुक्रवारी शहरात घडली.

मतदार यादीत नावे नसल्यावरून विजापूर येथील सिद्धेश्वर कला मंदिराच्या आवारात गोंधळ उडाला. शहरातील ९२ मतदान केंद्रांवर काही मतदार मतदान करण्यास पात्र नाहीत. त्यावरून मतदार आणि तहसीलदार सिद्दू बोसगी यांच्यात बाचाबाची झाली. आम्ही मतदान करू नये यासाठी काहींनी पडद्याआडून हा डाव रचल्याचा आरोप करत मतदारांनी तहसीलदारांना फैलावर घेतले. त्यावर प्रतिक्रिया देत तहसीलदार बोसगी यांनी, मतदानासाठी सायंकाळी ५ वाजेपर्यंत वेळ आहे, तोवर मतदारांची माहिती अपलोड करून मतदानास परवानगी दिली जाईल, असे आश्वासन दिले.


Recent Comments