Vijayapura

विजापूर पालिका निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

Share

विजापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज शुक्रवारी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
विजापूर महानगरपालिकेच्या एकूण 35 प्रभागांसाठी निवडणूक होत आहे. मतदारांनी मतदान केंद्रावर येऊन रांगेत उभे राहून मतदान करत आहेत. सर्वत्र शांततेत मतदान सुरू झाले आहे. दरम्यान, सर्वसामान्यांप्रमाणे रांगेत उभे राहून मंत्र्यांच्या मुलाने आणि सुनेने साधेपणा दाखवला आहे.

जलसंपदा मंत्री गोविंद कारजोळ यांचा मुलगा उमेश कारजोळ आणि सून श्रीदेवी यांनी रांगेत उभे राहून मतदान केले. विजापूर पालिकेच्या प्रभाग क्र. 10 मधील नागठाण मतदारसंघातील बसवेश्वर महाविद्यालयातील मतदान केंद्र क्रमांक 82 मध्ये त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

Tags:

vijapur corporation election voting