Chikkodi

हजरत टिपू सुलतान गेटच्या बांधकामाचा शुभारंभ

Share

चिकोडी येथील झारी गल्लीत हजरत टिपू सुलतान गेट निर्मिती आणि जुम्मा मस्जिद शादी महलच्या विकासकामांचा शुभारंभ विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्याहस्ते करण्यात आला.

हजरत टिपू सुलतान गेट निर्मितीसाठी २० लाख तसेच जुम्मा मस्जिद शादी महलच्या विकासासाठी २५ लाख रुपयांच्या निधीतून विकासकामांचा प्रारंभ करण्यात आला. विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्याहस्ते या कामकाजाला शुभारंभ करण्यात आला.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रकाश हुक्केरी म्हणाले, मुस्लिम धर्मीय बांधवांच्या मागणीला अनुसरून हजरत टिपू सुलतान गेट तसेच जुम्मा मस्जिद शादी महलच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला आहे.

याचप्रमाणे नगरपालिका सदस्य रामा माने यांनीही प्रतिक्रिया देताना, प्रकाश हुक्केरी यांच्या कार्याचे कौतुक केले. मुस्लिम धर्मीय बांधवांनी केलेल्या मागणीनुसार हजरत टिपू सुलतान गेट आणि जुम्मा मस्जिद शादी महलच्या विकासकामासाठी अनुदान मिळविण्यात प्रकाश हुक्केरी यांनी घेतलेली मेहनत हि कौतुकास्पद असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी नगरपालिका सदस्य गुलाब हुसेन बागवान, इरफान बेपारी, शाबीर जमादार, अनिल माने, विनोद माळगे, मुद्दुसर जमादार, वर्धमान सदलगे, आसिफ शिरगावकर, गुलजार शिरगावकर, जुहेब जमादार, शब्बीर झारी, अलीम पटेल, बुडेन मुत्तोले आदी उपस्थित होते.

Tags:

chikkodi prakash hukkeri