Chikkodi

चिकोडी येथे १ नोव्हेंबर रोजी होणार पुनीत राजकुमार पुतळ्याचे अनावरण

Share

कन्नड चित्रपट सृष्टीतील अभिनेते दिवंगत पुनीत राजकुमार यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा १ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती नगरपालिका अध्यक्ष प्रवीण कांबळे यांनी दिली.

चिकोडी नगरपालिका सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहिती दिली. राज्यासह चिकोडी येथेही पुनीत राजकुमार यांचे असंख्य चाहते असून नगरपालिका आणि विविध कन्नड संघटनांच्या सहयोगाने पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. चिकोडी येथील इंदिरा नगर क्रॉसजवळील खासदारांच्या कार्यालयासमोर पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात येणार असून १ नोव्हेंबर रोजी पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले, विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ, चॅम्पियन चित्रपटाचे अभिनेते सचिन पाटील आणि जगदीश कवटगीमठ आदींची प्रमुख उपस्थिती असेल.

यावेळी नगरपालिका उपाध्यक्ष संजय कवटगीमठ बोलताना म्हणाले, चिकोडी शहरातील जनतेची अनेक दिवसांपासूनची पुनीत राजकुमार यांचा पुतळा उभारण्याची मागणी होती. यानुसार तातडीने पुतळा प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे ते म्हणाले.

या पत्रकार परिषदेला विश्वनाथ कामगौडा, संतोष टवळे, काशिनाथ कुरणी, संजू बडिगेर, मंजुनाथ रोट्टी, मुख्याधिकारी डॉ. सुंदर रोगी आदी उपस्थित होते.

Tags:

chikkodi-november-1st-punit-rajkumar-statue-inauguration/