दिवाळी पाडव्यानिमित्त भरवलेल्या 36 जुगारी अड्ड्यांवर छापे टाकून बेळगाव जिल्हा पोलिसांनी 310 जुगाऱ्यांना अंदर केले. या छाप्यात जुगारात लावलेले तब्बल पावणेतीन लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
होय, दिवाळी पाडव्यादिवशी रात्री लक्ष्मीपूजनानंतर बेळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी भरविण्यात आलेल्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकून अंदर-बाहर जुगाराचे 36 गुन्हे दाखल केले.
तसेच या प्रकरणी 310 जणांना अटक करण्यात आली असून 2,75,045 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहे. जिल्ह्यातील एकूण 12 पोलीस स्थानकांच्या हद्दीत हे छापे टाकण्यात आल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख महानिंग नंदगावी यांनी दिली.
याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Recent Comments