Belagavi

प्रत्येक आईने कन्नडचा अभिमान बाळगावा : मंत्री शशिकला जोल्ले

Share

आजच्या स्पर्धात्मक युगात विकासासाठी आधुनिक वातावरणाशी जुळवून घेणे आवश्यक आहे. पण त्याच कारणासाठी आपण आपला देश, भाषा आणि संस्कृती विसरू नये, प्रत्येक आईने कन्नडचा अभिमान बाळगून मुलांवर तसे संस्कार करावेत आवाहन असे धर्मादाय, हज आणि वक्फ मंत्री शशिकला जोल्ले यांनी केले.

जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड आणि सांस्कृतिक विभाग आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ६७ व्या कर्नाटक राज्योत्सवाचा एक भाग म्हणून आज शुक्रवारी सकाळी ११ वाजता सुवर्णसौधच्या प्रांगणात आयोजित ‘कोटी कंठ गायन’ कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या.

मंत्री शशिकला जोल्ले पुढे म्हणाल्या, ‘आजकाल सगळीकडे आधुनिक आई बघायला मिळते, जी आपल्या मुलाला स्तनपान करत नाही, बाटलीने दूध पाजते, चॉकलेट खायला देते आणि पॉप गाणी गाते’. अशा मातांमुळे मुलांवर कसले संस्कार होणार आणि त्यांची निकोप वाढ तरी कशी होणार? असा सवाल करून त्यांनी प्रत्येक आईने कन्नडचा अभिमान बाळगून मुलांवर त्याचे संस्कार केले पाहिजेत असे सांगितले.

अतिथी म्हणून बोलणाऱ्या बेळगावच्या खासदार मंगल अंगडी म्हणाल्या की, राज्य आणि भाषेच्या उत्सवाच्या बाबतीत केवळ आरडाओरडा आणि धूमधडाका पुरता मर्यादित न राहता संयमाने उत्सव साजरा केला पाहिजे. प्रत्येक क्षण आनंदाने जगला पाहिजे.

कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षक विनायक मोरे यांच्या नेतृत्वाखाली नाडगीते सादर केली.
उदयगली नम्म चेलुव कन्नड नाडू, बारिसू कन्नड दिंडीमवा, हच्चेवू कन्नड दीपा, विश्व विनूतना विद्या चेतना, आदी गीतांचे सादरीकरण करून संगीत शिक्षक विनायक मोरे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी व अधिकाऱ्यांनी जल्लोष केला.

हजारो कन्नड लोकांच्या एकमताने त्यांनी कन्नड भूमी, पाणी, लोक, संस्कृती आणि वारसा यांच्या रक्षणासाठी वचनबद्ध राहण्याची शपथ घेण्यात आली.

कोटी कंठ गायनाच्या यशस्वी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हवेत फुग्यांचे गुच्छ सोडण्यात आले. आकाशामध्ये पिवळ्या, लाल रंगाचे फुगे अतिशय आकर्षकरित्या तरंगत होते

यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत सीईओ दर्शन एचव्ही, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील, शहर पोलीस आयुक्त बोरलिंगय्या, डीसीपी रवींद्र गडादी, कन्नड व संस्कृती विभागाच्या सहाय्यक संचालक विद्यावती भजंत्री, हजारो विद्यार्थी, सर्व अधिकारी, कर्मचारी व जिल्ह्यातील नागरिक उपस्थित होते. सुनीता देसाई यांनी सूत्रसंचालन केले.

Tags:

belagavi suvarna soudha singing program