येडूर ते श्रीशैल पर्यंतच्या ऐतिहासिक पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून काशीचे नवे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य स्वामी यांच्याहस्ते या पदयात्रेच्या शुभारंभ करण्यात आला. सुमारे ५० हुन अधिक मठाधीशांनी या पदयात्रेत सहभाग नोंदविला.

श्रीशैल जगद्गुरू डॉ. चन्नसिद्दराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी यांचा द्वितीय पिठारोहण महोत्सव तसेच जन्म सुवर्णमहोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम आणि जनजागृती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून येडूर ते श्रीशैल पर्यंत २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत भव्य पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे.

यासंदर्भात चिकोडी तालुक्यातील येडूर गावातील सिध्दतीर्थ यात्रीनिवास येथे आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना श्रीशैल जगद्गुरू म्हणाले, या पदयात्रेचा शुभारंभ भव्य पद्धतीने करण्यात येणार आहे. शुक्रवारी काशी येथील नव्या जगद्गुरूंच्या हस्ते येडूर येथील प्राथमिक उपचार केंद्र ते जुने येडूर गावापर्यंत रुद्रपाद बसवेश्वर देवस्थान, श्री वीरभद्रेश्वर देवस्थानमार्गे काडसिद्धेश्वर मठापर्यंत पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे.
शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता वीरभद्रेश्वर देवस्थानासमोरून या पदयात्रेचा शुभारंभ होणार आहे. यावेळी काशी जगद्गुरू, निडसोशी पंचमशिवलिंगेश्वर स्वामी यांच्यासह ५० हुन अधिक मठाधीश सहभागी होणार आहेत. याचप्रमाणे केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री आणि खासदार, आमदारांसह अनेक मान्यवरांचीही उपस्थिती असेल. दुपारी ३ वाजता सुक्षेत्र येडूर वीरभद्रेश्वर देवस्थांपासून श्रीशैल पर्यंतच्या पदयात्रेला सुरुवात होईल. अशी माहिती त्यांनी दिली.
या पदयात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सहभागी होतील, अशी आशा असून यासंदर्भात पंतप्रधानांनी ग्वाहीदेखील दिली असल्याचे श्रीशैल जगद्गुरूंनी सांगितले.
यावेळी कंत्राटदार शिवानंद करोशी बोलताना म्हणाले, येडूर ते श्रीशैल पर्यंतच्या पदयात्रेत विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, आमदार गणेश हुक्केरी आणि त्यांचे समर्थकदेखील मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या पदयात्रेत पाणी, लाईटिंन्ग यासह आवश्यक त्या सर्व सुविधांची व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला श्रीशैल जगद्गुरू पदयात्रेसंदर्भात चिंदोडी बंगारेश यांनी लिहिलेल्या लघुपटाचे प्रदर्शन आमदार गणेश हुक्केरी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आमदार गणेश हुक्केरी, माजी आमदार शिवशंकर, अंबिका नगर येथील ईश्वर पंडिताराध्य, शहापूर स्वामी आदी उपस्थित होते.


Recent Comments