मद्यधुंद पतीने जेवण करून झोपलेल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील गुर्लापूर गावात घडली.
यल्लव्वा पांडुरंग हारुगेरी (५५) या महिलेची तिच्या दारुड्या पतीने हत्या केली. पांडुरंग हारुगेरी असे या पापी पतीचे नाव असून त्याने झोपलेल्या पत्नीचा खून केला. पत्नीची हत्या करून पती पांडुरंग हारुगेरी फरारी झाला आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत, मात्र हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मुडलगी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली आहे. याप्रकरणी मुडलगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Recent Comments