उसाला प्रतिटन ५५०० रुपये दर जाहीर करण्यात यावा, यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच असून रायबाग तालुक्यातील हारुगेरी क्रॉसनजीक आज शेतकऱ्यांनी राज्य महामार्ग रोखून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.


उसाला प्रति टन ५५०० रुपये भाव देण्याची मागणी करत राज्य सरकारविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असून या पार्श्वभूमीवर आज रायबाग तालुक्यातील हारुगेरी क्रॉसजवळ जत्त-जांबोटी आणि जमखंडी-मिरज राज्य महामार्ग रोखून शेतकऱ्यांनी आंदोलन केले. हारुगेरी क्रॉस येथे शेतकऱ्यांनी वाहने अडवून निदर्शने करत राज्य सरकार आणि मुख्यमंत्री बस्वराज्ज बोम्मई यांच्या विरोधात संताप व्यक्त केला.
या आंदोलनात बेळगाव जिल्ह्यातील विविध भागातील शेतकरी सहभागी झाले होते. कित्येक दिवसांपासून सरकारकडे दाद मागूनही प्रतिसाद न मिळाल्याने शेतकरी संघटना, सरकारविरोधात आंदोलन तीव्र आंदोलन छेडत आहेत.


Recent Comments