चिकोडी शैक्षणिक जिल्हास्तरीय प्राथमिक शाळेत क्रीडास्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या कार्यक्रम पत्रिकेत दिवंगत आमदार आनंद मामनी यांचे नाव छापण्यात आले असून शैक्षणिक विभागाच्या या सावळ्या गोंधळासंदर्भात जोरदार टीकाटिप्पणी केली जात आहे.

२३ ऑक्टोबर रोजी सौंदत्ती मतदार संघाचे आमदार आनंद मामनी यांचे निधन झाले. विधानसभा उपसभापती असलेल्या आनंद मामनी यांचे निधन होऊनही चिकोडी जिल्हास्तरीय शैक्षणिक क्रीडा स्पर्धेच्या निमंत्रण पत्रिकेत त्यांचे नाव छापण्यात आल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतील गोंधळामुळे सध्या हा विषय जोरदार चर्चेचा ठरला आहे.


Recent Comments