मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज बेंगळुरात ‘फ्रोझन मेमरीज’ या फोटो प्रदर्शनाचे उद्घाटन केले.
राजधानी बेंगळूर येथील चित्रकला परिषदेत आज प्रेस फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने “फ्रोझन मेमरीज” नामक फोटो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. नंतर मुख्यमंत्री बोम्मई यांनी येथे प्रदर्शित केलेली छायाचित्रे पाहिली.

यावेळी गृहनिर्माण व पायाभूत सुविधा विकास मंत्री व्ही.सोमन्ना, खासदार पी. सी. मोहन, व्यापारी एस.पी. दयानंद, प्रेस फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष मोहन कुमार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments