Khanapur

माचीगड, हलसाल,कापोली, शिवठाण येथे काळ्या दिनाबाबत जागृती

Share

खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने तालुक्यातील माचीगड, हलसाल, कापोली, शिवठाण येथे फेरी काढून खानापूर येथे येत्या 1 नोव्हेंबरच्या निषेध सभेबाबत जनजागृती करण्यात आली. मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित राहून सीमावासियांच्या महाराष्ट्रात सामील ह्ण्याची लोकेच्छा प्रकट करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.

संपूर्ण सीमाभागाचा जिव्हाळ्याचा व जन्ममरणाचा असलेला सीमाप्रश्न लवकरात लवकर सुटावा यासाठी संपूर्ण सीमा भागातील मराठी भाषिक हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे न्यायदेवतेकडे मोठ्या अपेक्षेने बघत आहेत. भाषावार प्रांतरचना झाली, त्यावेळी संपूर्ण सीमाभागावर केंद्र शासनाने अन्याय करून हा संपूर्ण मराठी भाषिक बहुल भाग कर्नाटकला जोडला. त्या दिवसापासून म्हणजेच एक नोव्हेंबर 1956पासून संपूर्ण सीमा भागामध्ये एक नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळण्यात येतो.

त्यानुसार येणारा एक नोव्हेंबर खानापूर तालुक्यातील मराठी भाषिक असलेल्या गावांमध्ये कडकडीत बंद पाळून केंद्र शासनाचा निषेध करावा या हेतूने खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती तालुक्यातील प्रत्येक खेड्यामध्ये जाऊन काळा दिन गांभीर्याने पाण्याबाबत पत्रके वाटून जनजागृती करण्यात येत आहेत. आज माचीगड या गावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली जागृती करण्यात आली.

यावेळी गावातील प्रत्येक घरामध्ये जनजागृतीची पत्रके वाटून गावातील नागरिकांनी काळा दिन गांभीर्याने पाळावा असे आवाहन गोपाळराव देसाई व समिती पदाधिकाऱ्यांनी केले. तसेच एक नोव्हेंबर रोजी स्टेशन रोड खानापूर येथील लक्ष्मी मंदिर येथे 11 ते 2 लाक्षणिक उपोषण व सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात मराठी भाषिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा व केंद्र शासनाचा निषेध करावा तसेच खानापूर पी एल डी बँकेचे संचालक व माचीगडचे रहिवासी पप्पू पाटील यांनी सुद्धा एक नोव्हेंबर काळा दिन सुतक दिन समजून मराठी भाषिक नागरिकांनी पाळला आहे, यापुढेही असाच पाळावा असे आवाहन केले.

यावेळी गावातील तुकाराम जाधव, मारुती बावडेकर, सिमन्स रचन, सिद्धाप्पा केसरकर, फकीरा चेन्नगे, पांडुरंग बावडेकर, एकनाथ बावडेकर, महादेव बावडेकर, पिराजी कोंडे, मल्हारी शेळके, सदानंद कोंडे, पुंडलिक बावडेकर, सुशील कोंडे, गुरुनाथ केसरकर, महादेव केसरकर, पुंडलिक केसरकर तसेच गावातील युवावर्ग उपस्थित होता. यावेळी युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, समितीचे ज्येष्ठ नेते पी. एच. पाटील, दत्तू कुट्रे, संभाजी देसाई, संजय देसाई, राजाराम देसाई, रामचंद्र गावकर, राजू पाटील, महादेव मिराशी आदी उपस्थित होते.

Tags:

knpr-mes-black-day-jagruti