artist

बेळगावमध्ये उत्कृष्ट निसर्ग छायाचित्राचे प्रदर्शन

Share

पश्चिम घाट, सह्याद्री रांगा आणि या परिसरातील निसर्गरम्य आणि प्रेक्षणीय ठिकाणे.. निसर्गाच्या रूपातून विधात्याने मुक्त हस्ताने केलेल्या सौंदर्याच्या या उधळणीचे छायाचित्रण करण्याचा मोह कुणालाच आवरत नाही. या परिसरातील प्रेक्षणीय स्थळांच्या, विविध छायाचित्राकारांनी टिपलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन खास बेळगावकरांसाठी भरविण्यात आले आहे.

पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या पर्वतरांगा, येथील जैवविविधता, धबधबे, नद्या, खोरे, इथे वसलेली वस्ती, छोटी छोटी गावे, या गावाची परंपरा, स्मारके हि प्रत्येकाला भुरळ घालणारी आहेत. कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये पसरलेल्या पश्चिम घाटाची अनुभूती हि वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. या भागाचे छायाचित्रण करून विविध छायाचित्रकारांनी टिपलेल्या निसर्गाच्या छटांची छायाचित्रं खास बेळगावकरांच्या आणि विशेषतः निसर्गनप्रेमींसाठी दिवाळीसाठी मिळालेली मेजवानी आहे. बेळगावमधील खानापूर रोड वरील बामणे टॉवर मध्ये अर्केन स्टुडिओज यांच्यावतीने छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

 

यासंदर्भात निसर्गप्रेमी डॉ. संजय जाधव बोलताना म्हणाले, अमृत चरंतीमठ, निरंजन संत, डॉ. नागेंद्र कलाल यांनी निसर्गाच्या विविध छटा आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्या असून निसर्गाविष्कार पाहण्याची संधी प्रत्येकाला मिळावी, यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. अलीकडे केवळ टीव्ही आणि मोबाईलवर प्रत्येकाचा अधिक भर असून बाहेरील निसर्ग पाहण्यासाठी प्रत्येकाने अवश्य जावे, असा सल्ला त्यांनी दिला.

 

यावेळी अमृत चरंतीमठ बोलताना म्हणाले, अनेक वर्षांपासून हि छायाचित्रे छायाचित्रकारांकडून टिपण्यात येत असून या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्याची अनेक दिवसांपासूनची आपली इच्छा होती. याचप्रमाणे उत्तर भारतात देखील अनेक प्रेक्षणीय स्थळे असून त्याठिकाणीही भेट देऊन तेथील वैभव आपल्याला कॅमेऱ्यात कैद करायची इच्छा असल्याचेही त्यांनी बोलून दाखविले.

 

निसर्गप्रेमींना बेळगावमध्ये असा कलाविष्कार पाहण्यासाठी उपलब्ध करून देऊन अर्केन स्टुडिओजने मोठे परिश्रम घेतले असून या प्रदर्शनासाठी अनेक निसर्गप्रेमींचे भरभरुन  दाद मिळत आहे.

Tags:

click photo