social

विजापुरातील विद्यार्थ्यांनी शेती कामासाठी बनविला ड्रोन कॅमेरा

Share

संरक्षण विभाग, मोठमोठे कार्यक्रम याव्यतिरिक्त लग्न समारंभ, आणि अलीकडे होणारे इव्हेंट्स या व्यतिरिक्त आता ड्रोन कॅमेराचा वापर शेतीकामासाठी होत असून शेतीविषयक प्रयोगांमध्ये ड्रोनचा वापर उपयुक्त ठरत आहे. अशा प्रकारचे ड्रोन कसे उडवायचे आणि वापरायचे हे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी विजापुरात कार्यशाळा घेण्यात आली.

विजापूर शहरातील प्रतिष्ठित शाळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या बी एम पाटील पब्लिक स्कुल मध्ये भारत सरकारच्या “नीती आयोग” अंतर्गत भव्य अटल टिंकरिंग अंतर्गत दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि दुसऱ्या दिवशी कार्यशाळेत बनविण्यात आलेल्या ड्रोन कॅमेऱ्याचे प्रात्यक्षिकही दाखविले. विज्ञान आणि तंत्रज्ञानावर चालणाऱ्या या जगात विद्यार्थ्यांनी कोडिंग – डिकोडिंग शिकून भविष्यात रॉकेट लॉन्च उपक्रमात, नासाच्या कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा उपयुक्त ठरणाऱ्या बनत चालल्या आहेत. या कार्यशाळेत मुंबईचे राहुल आमीन खान यांनी प्रशिक्षण दिले.

 

यावेळी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पधेती विजयी विद्यार्थ्यांना ड्रोन किट प्रदान करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले बीएलडीई संस्थेचे संचालक आर बी कोतनाळ बोलताना म्हणाले, विज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सदर कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून शाळेने राबविलेली हि संकल्पना कौतुकास्पद आहे.

 

यावेळी बीएलडीई संस्थेचे मुख्य वित्तीय अधिकारी आणि आर्थिक सल्लागार देवेंद्र कुमार अगरवाल बोलताना म्हणाले, विजापूरमधील विद्यार्थ्यांना अशापद्धतीच्या कार्यशाळा आयोजित करून उत्तम प्रोत्साहन देण्याचे कार्य केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसित होण्यास मदत होईल.

 

शाळेचे संचालक कौशिक ब्यानर्जी , प्रा. बंधना बॅनर्जी, समन्वयक दीपा जांबुरे, जलनगर विभागाचे प्रा. दर्शन हुनगुंद आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यशाळेत सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

 

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना ड्रोनचे महत्व पटवून देण्यात आले. तसेच ड्रोनच्या विविध उपयोगांसंदर्भात माहितीही देण्यात आली.

 

विजयकुमार सारवाड, आपली मराठी विजापूर

Tags: