National

ब्रिटनमध्येही दिवाळी ! भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधान

Share

भारतीय वंशाचे ब्रिटनचे नेते ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे एकेकाळी भारतावर राज्य केलेल्या राणीच्या देशाची सत्तासूत्रे एका भारतीयाकडे आली आहेत.

ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्यामुळे सुनक यांचा विजय जवळजवळ निश्चित मानला जात होता. जॉन्सन यांनी माघार घेतल्यानंतर पेनी मॉर्डन्ट यांच्याकडे सुनक यांचे प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जात होते. मात्र सत्ताधारी हुजूर पक्षाच्या खासदारांनी सुनक यांना पाठिंबा दिल्यामुळे शेवटी ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सुनक हे मागील सात महिन्यांतील ब्रिटनचे तिसरे पंतप्रधान असतील.
जगप्रसिद्ध भारतीय आयटी कंपनी इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायणमूर्ती यांचे ऋषी सुनक हे जावई आहेत.

ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याने ऐन दिवाळीत ब्रिटनमध्ये दिवाळी साजरी झाली आहे. त्याशिवाय एकेकाळी भारतावर राज्य केलेल्या राणीच्या देशाची सत्तासूत्रे एका भारतीयाकडे आली आहेत. समस्त भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे.

Tags: