जेडीएस प्रदेशाध्यक्ष सी एम इब्राहिम यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर मुस्लिम आरक्षणप्रश्नी हल्लाबोल चढविला असून मुख्यमंत्री हे अर्धेकच्चे संघ स्वयंसेवक असल्याची टीका केली आहे.
विजापुरात आज मुस्लिम आरक्षण हटवण्याच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना इब्राहिम म्हणाले की, मुस्लिम आरक्षण हटवता येणार नाही. माजी पंतप्रधान देवेगौडा सत्तेत असताना मुस्लिमांना कायदेशीररीत्या ४ टक्के आरक्षण दिले होते.
घटनेनुसार समितीचा अहवाल स्वीकारण्यात आला असून माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना आरक्षणाच्या मुद्द्याला हात लावणे शक्य नव्हते. तर मग बोम्मई मुख्यमंत्रीपदी आल्यावरच मुस्लिम आरक्षण हटविण्याची चर्चा कशासाठी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिवाय येडियुरप्पा हे मूलतः आरएसएसचे होते पण बोम्मई हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अर्धेकच्चे स्वयंसेवक असल्याची टीका करत इब्राहिम यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडविली. मुस्लिम आरक्षणप्रश्नी सर्वसमावेशक चर्चा होणे आवश्यक आहे, अशी मागणीही त्यांनी केली.


Recent Comments