बेळगाव जिल्ह्यातील निप्पाणी तालुक्यातील हणबरवाडी गावात साप चावल्याने 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला.

पार्ष्व शांतीनाथ गोटुरे वय 8 असे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. तो इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकत होता. त्याच्या घराजवळ खेळत असताना त्याला विषारी साप चावला. घरच्यांनी त्याला महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील खासगी इस्पितळात दाखल केले होते. परंतु उपचार निष्फळ ठरल्याने मुलाचा मृत्यू झाला. ही घटना निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.


Recent Comments