Hukkeri

अप्पणगौडा यांचे कर्तृत्व अविस्मरणीय : महंत प्रभु स्वामीजी

Share

दिवंगत अप्पणगौडा पाटील यांनी आपल्या हयातीत विविध क्षेत्रात केलेले कर्तृत्व अविस्मरणीय आहे असे शेगुणशीचे महंतप्रभू स्वामीजी यांनी सांगितले.

संकेश्वर येथील श्री दुरंडेश्वर विद्यार्थी संघाच्यावतीने दिवंगत अप्पणगौडा पाटील यांच्या ४८ व्या पुण्यतिथी कार्यक्रमात सहभागी होऊन महंतप्रभू स्वामीजी यांनी संघाच्या प्रांगणात अप्पणगौडा व बसगौडा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यावर पत्रकारांशी संवाद साधला. दिवंगत अप्पणगौडा पाटील यांनी आपल्या जीवनात समाजाच्या कल्याणासाठी अनेक क्षेत्रात चांगले कार्य केले. त्यांचा आदर्श जोपासून तरुण पिढीने त्यांनी दाखविलेल्या मार्गावरून वाटचाल केली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

त्यानंतर माजी मंत्री ए.बी.पाटीला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. संघाच्या आवारात नव्याने बनवलेल्या क्रिकेट आणि स्केटिंग मैदानाचे उद्घाटन बोलताना कन्नड साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. मनू बळीगार यांनी सांगितले की, लिंगैक्य अप्पणगौडा यांच्याविषयी अभ्यासिका सुरु करण्यासाठी मुख्यमंत्री आणि विद्यापीठांना आग्रह केला जाईल. त्यांनी अनेक क्षेत्रात आपली छाप सोडली आहे. लाखो विद्यार्थ्यांसाठी ते दीपस्तंभ ठरले आणि तरुणांना उपलब्ध रोजगार करून दिल्याचे त्यांनी सांगितले.

व्यासपीठावर श्री दुरंडेश्वर विद्यावर्धक संघाचे उपाध्यक्ष जी. एस. इंडी, नियामक मंडळाचे सदस्य बसनगौडा पाटील, डी. एस. केस्ती, काशिनाथ शिरकोळी, कलगौडा निंगनूरी, विश्वनाथ तोडकार, सचिव जी. सी. कोटगी, प्रशासकीय अधिकारी डॉ. बी. ए. पुजारी आदी उपस्थित होते. यावेळी एसडीव्हीएस संघाच्या विविध शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य व व्याख्याते उपस्थित होते.

Tags:

hukkeri-appangouda-punyatithi/