मांगल्याचा, प्रकाशाचा आणि दिव्यांचा सण दिवाळी सर्वत्र उत्साहात साजरी केली जाते. दरात वाढ होऊनही लोक विविध वस्तूंच्या खरेदीच्या प्रेमात पडले आहेत. तसेच बेळगावातही फुलांच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची झुंबड उडाल्याचे दिसून येत आहे.
व्हॉइस : होय, बेळगावच्या फुलबाजारात मोठ्या प्रमाणात ग्राहक विविध प्रकारची फुले खरेदी करताना दिसत आहेत. शेवंतीची फुले 170 ते 250 रुपये किलो या दराने, तर झेंडूची फुले 70 ते 120 रुपये या दराने विकली जात आहेत. फुलांच्या किमती वाढल्या असल्या तरी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात बाजारात येऊन हव्या त्या फुलांची खरेदी केली. उद्या दिवालिसनाचे लक्ष्मीपूजन व बुधवारी पाडवा असल्याने घरोघरी आणि दुकान-आस्थापनांत झेंडूच्या व अन्य फुलांची सजावट, आरास केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बेळगाव होलसेल फुलबाजारात आज, रविवारी फुल्ल गर्दी दिसून आली.


Recent Comments