सौंदत्ती यल्लम्मा मतदारसंघाचे आमदार आणि विधानसभेचे उपसभापती आनंद मामनी यांचे पार्थिव सौंदत्ती येथे आणण्यात झाले आहे. आज सकाळी त्यांचे बंगळुर येथील मणिपाल रुग्णालयात निधन झाले होते.


दरम्यान, आपल्या आवडत्या नेत्याचे पार्थिव त्यांच्या गावी पोहोचताच चाहत्यांना अश्रू अनावर झाले. मामनी यांच्या निधनाने संपूर्ण सौंदत्ती मतदारसंघ शोकसागरात बुडाला आहे. आनंद मामनी यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी चाहत्यांनी गर्दी करून अश्रू ढाळले. दरम्यान, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे देखील सौंदत्ती येथे येत आहेत.

आज संध्याकाळी आनंद मामनी यांच्या पार्थिवावर त्यांच्या फार्म हाऊसवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अनेक मंत्री, आमदार, रेणुका-यल्लमा देवस्थानचे पुजारी, भाविक आणि हजारो चाहते अंत्यसंस्काराच्या सहभागी होणार आहेत. त्यासाठी सौंदत्ती तालुका प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात येत आहे.


Recent Comments