Khanapur

रस्ता दुरुस्ती मोहिमेला पोलिसांनीही लावला हातभार !

Share

पोलीस म्हटले की, खाकी वर्दीतील दरडावणारी व्यक्ती असाच आपल्यापैकी अनेकांचा समज असतो. त्यामुळे अनेकजण त्यांना टाळण्याचाच प्रयत्न करतात. मात्र खानापूर पोलिसांनी हा समज खोटा ठरवत चक्क रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी ग्रामस्थांना हातभार लावला.

होय, खानापूर तालुक्यातील जांबोटी भागातील कुसमल्लीजवळ मलप्रभा नदीच्या पुलावरील रस्ता खराब झाल्याने कुसमळ्ळी ग्रामस्थांनी तो दुरुस्त करण्याची मोहीम राबवली. या ग्रामस्थांसोबत खानापूर पोलिसांनीही या कार्यात हातभार लावला. त्यांनी वाहतूक सुरळीत होण्यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजवले. सार्वजनिक ठिकाणी कामात गुंतलेली ही दृश्ये पाहून आपल्या मनात आदराची भावना निर्माण होते.

खानापूर पोलिस स्थानकाचे एएसआय बडिगेर, कुतबुद्दीन सनदी, आय. एम. नन्नेखान यांच्यासह कुसमळ्ळी गावचे अनंत सावंत, पवन गायकवाड, विलास गायकवाड आदींनी ही रस्ता दुरुस्ती मोहीम राबवली. जमीनदोस्त झालेला रस्ता दुरुस्त करून जनतेला ये-जा करण्यास सक्षम करून असे लोकाभिमुख काम करणाऱ्या खानापूरच्या पोलिसांचे कौतुक होत आहे.
अल्ताफ बसारीकट्टी, आपली मराठी, खानापूर.

Tags:

/travellers-praised-khanapur-police-work/