विजापूर जिल्ह्यातील चडचण आणि इंडी तालुक्यांमध्ये ऐन पावसाळ्यात सापांमुळे जनता हैराण झाली आहे. सापांचा हा उपद्रव इतका वाढला आहे की, तेथे लोक घरे, जमीन आणि बागा सोडून अन्यत्र जात आहेत. त्याहूनही गंभीर म्हणजे लोक घरांना आग लावत आहेत आणि जेसीबी वापरून घरे उद्ध्वस्त करत आहेत.
होय, विजापूर जिल्ह्यातील चडचण आणि इंडी तालुक्यातील लोकांसमोर परतीच्या पावसाच्या हाहाकारासोबत एक नवेच संकट उभे ठाकले आहे. येथील सर्व आबालवृद्धांना सापाच्या भीतीपोटी जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांची मोठी भीती त्यांना वाटत आहे. शेती-शिवारात घरे बांधून राहणाऱ्या शेतकऱ्यांवर तर जणू आभाळ कोसळले आहे. सततच्या पावसामुळे त्यांच्या घरांमध्ये पाणी साचले आहे. पाण्यासोबतच घरांमध्ये साप-विंचू येत असल्याने जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. सापांना घरातून बाहेर काढण्यासाठी लोक चक्क आपल्या प्रिय घरांनाच आग लावत आहेत. सावळसंग आणि हालळ्ळी गावात गावकऱ्यांनी आपली घरे जाळली असून, इंचगेरी गावात साप चावल्याने एका मुलीचा मृत्यू झाल्यामुळे इंचगेरी गावात घर उद्ध्वस्त केल्याची घटनाही घडली आहे. चडचण तालुक्यातील हालळ्ळी गावातील इट्टू इंगळे यांनी घराला आग लावली. घरात खतरनाक नागसाप घुसल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. त्यामुळे घरातील सॅप जळून कोळसा झाले. दरम्यान, सर्पमित्रांकडून दररोज सापांची सुटका केली जात आहे. घरोघरी साप पकडण्याचे काम करणाऱ्या सरपटणारे प्राणी प्रेमी सिद्धू पुजारी यांचे कौतुक होत आहे. चडचण, इंडी या दोन्ही तालुक्यांना सापांनी हैराण करून सोडले आहे. कितीही साप पकडले आणि वाचवले तरी ते पुन्हा पुन्हा दिसू लागले आहेत. सापांच्या भीतीने ग्रामस्थ चिंतेत आहेत. त्यांनी तालुका प्रशासनाला मदतीची विनंती केली आहे.


Recent Comments