हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर येथील एसडीव्हीएस संघाच्या बीबीए विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या आवारात दिवाळी उत्सवासाठी लागणाऱ्या वस्तूंची विक्री करून व्यावसायिक ज्ञान आत्मसात केले.

व्यावसायिक अभ्यासक्रम असणाऱ्या बीबीए शाखेच्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच दिवाळी मिठाई, सजावट आणि फटाके याचप्रमाणे चाट फूडची विक्री करून कौशल्यावर आधारित व्यवसायाची माहिती मिळविली.
महाविद्यालयाच्या आवारात भरविण्यात आलेल्या वस्तू प्रदर्शन आणि विक्रीसंदर्भात माहिती देताना या महाविद्यालयाच्या एका विद्यार्थिनीने सांगितले, व्यावहारिक ज्ञान केवळ पुस्तकातून शिकविले जाते. मात्र या महाविद्यालयात प्रत्यक्षात व्यवसायिक ज्ञान मिळावे, यासाठी असे उपक्रम आयोजित करून सुवर्णसंधी आपल्याला प्राप्त करून देण्यात आली असल्याचे या विद्यार्थिनीने सांगितले.

एसडीव्हीएस संघाच्या बीबीए शाखेच्या विद्यार्थ्यांना दिवाळीच्या निमित्ताने विविध वस्तूंची विक्री करून नफा-तोटा आणि व्यवसायाचे ज्ञान जाणून घेण्याची संधी देण्यात आली आहे, अशी माहिती प्राचार्य महेश गौडा पाटील यांनी दिली.
यावेळी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी फराळ, सजावटीच्या वस्तूंची खरेदी केली. या प्रदर्शनात नानाविध प्रकारचे फास्टफूड आणि चटपटीत पदार्थांची मेजवानी देखील उपलब्ध करून देण्यात आली होती.


Recent Comments