काल रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे चिक्कोडी तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. याशिवाय चिक्कोडी ते मिरज दरम्यानचा रस्ता जलमय झाला असून, बहतुकीवर परिणाम झाला आहे.

होय, काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे चिक्कोडी तालुक्यात सर्वत्र जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अंकली गावाजवळ चिक्कोडी-मिरज रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून रस्ता तुंबला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. पाणी साचल्याने दुचाकींचा संचार पूर्णतः ठप्प झाला आहे. त्याशिवाय रस्त्याकडील सौरभ आणि सिंदूर या दोन ढाब्यात पाणी साचून अनेक मौल्यवान वस्तू वाहून गेल्या. काडापूर रस्त्यावरून केवळ छोट्या वाहनांचा संचार सुरु आहे. या वर्षी तिसऱ्यांदा हा रस्ता पाण्याने तुडुंब भरला आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे


Recent Comments