भटक्या कुत्र्यांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांकडे तक्रार करून बेळगाव शहरातील सामाजिक कार्यकर्त्या अनिता दोडमणी या चर्चेत आल्या आहेत.
व्हॉईस : होय, बेळगावच्या शहापूर भागात भटक्या कुत्र्यांना अन्न आणि उपचार देणाऱ्यांना पोलीस त्रास देत असल्याचा आरोप ऐकिवात आला आहे. भटक्या कुत्र्यांना खायला देऊ नये यासाठी शहापूर सीपीआय दडपशाही करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आम्ही शेकडो भटक्या कुत्र्यांना चारा आणि उपचार देऊन त्यांची काळजी घेत आहोत. कुत्र्यांचा स्थानिकांना त्रास होत आहे. त्यांना पोसू नये म्हणून शहापूर सीपीआय दडपशाही करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि राज्यपालांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. भटक्या कुत्र्यांना त्रास देत आहेत अशी तक्रार प्रथम शहापूर सीपीआयकडे केली. पण त्यांनी कारवाई केली नाही. त्याऐवजी, समजुतीने घ्या असे सांगत पिटाळून लावले. आमच्याकडे परवाना आहे. लोक सतत त्रास देत असल्याचा आरोप अनिता दोडमणी आणि प्रीती दोडमणी यांनी केला आहे.

एकंदर, माणसांना तोंड असते, जेव्हा त्यांना भूक लागते तेव्हा ते कोणाकडूनही मागून अन्न खाऊ शकतात. पण मुके प्राणी अन्न मागू शकत नाहीत. अशा प्रकारे भटक्या कुत्र्यांची भूक शमवणाऱ्या या समाजसेवकांना सहकार्य करण्याऐवजी पोलिसांनीच त्यांना प्रतिबंध का केला?, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.


Recent Comments