Belagavi

वाढीव आरक्षणासाठी मादिग समाजातर्फे ‘चलो सुवर्णसौध’चा नारा

Share

राज्यभरातील अनेक समाज वाढीव आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असून मादिग समाजानेही या आंदोलनासाठी आवाज उठविला आहे. मादिग समाजाला वाढीव आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी जण आंदोलन बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मादिग संघटना मानद अध्यक्ष प्रशांत ऐहोळे यांनी दिली.

यासंदर्भात बेळगावमध्ये कर्नाटक राज्य मादिग संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद बोलाविण्यात आली होती. यावेळी बोलताना प्रशांत ऐहोळे म्हणाले, मागासवर्गीय समाजाला लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण देण्यासंदर्भात विचार विनिमय करून १०१ जातींना समान आरक्षण देण्यात यावे. सामाजिक न्यायासाठी हिवाळी अधिवेशनात आरक्षणासंदर्भात निर्णय ना झाल्यास अजित मादर आणि एस आर रंगनाथ यांच्या नेतृत्वाखाली चलो सुवर्णविधानसौध आंदोलन छेडण्यात येईल, तसेच १४ डिसेंबर पासून धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असे ते म्हणाले.

यानंतर चंद्रकांत काद्रोळ्ळी बोलताना म्हणाले, न्यायमूर्ती नागमोहनदास अहवालात करण्यात आलेल्या शिफारसीनुसार मागासवर्गीय जातील २ टक्के वाढीव आरक्षण देण्यात यावे. या शिफारसीनुसार सरकारने अधिकृत रित्या आरक्षण जाहीर करावे, यानुसार मादिग समाजाला देण्यात येणाऱ्या १५ टक्के आरक्षणात वाढ करून १७ टक्के आरक्षण देण्यात यावे. आरक्षणप्रश्नी जे आमदार आरक्षणाच्या बाजूने आवाज उठवत नाहीत, अशा आमदारांचा पुढील निवडणुकीत पराभव करण्यासाठी जनजागृती करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

या पत्रकार परिषदेला नेते रमेश मादर, एस आर रंगनाथ, रमेश रायप्पगोळ, बसवराज काडापूर आदींसह इतर समाजबांधव उपस्थित होते.

Tags:

madiga-sangha-warns-to-mlas/