Belagavi

कुरुबर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करावे : मडेप्पा तोळीनवर

Share

राज्य सरकारने कनक जयंतीच्या आत कुरुबर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करावे अशी मागणी कर्नाटक कुरुबर संघाचे जिल्हाध्यक्ष मडेप्पा तोळीनवर यांनी सरकारकडे केली आहे.

शुक्रवारी बेळगावमध्ये कुरबर समाजाच्यावतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना तोळीनवर म्हणाले, राज्यात ८० लाखाहून अधिक लोकसंख्या कुरबर समाजाची आहे. हा समाज अत्यंत मागासलेला असून शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय स्तरावर देखील मागासलेला आहे. या समाजाला २ए श्रेणीत आरक्षण देण्यात आले आहे. आपल्या समाजात अनेक पोटजाती असून या समाजाला आता अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यात यावे साठी अनेक आंदोलने देखील करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या समाजाच्या मागणीची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात यावी, अशी मागणी यावेळी तोळीनवर यांनी केली.

कोडगु जिल्ह्यातील कुरबर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात आले आहे. बिदर जिल्ह्यात आपल्या समाजातील पोटजात असलेल्या गोंड समाजालाही अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात आले आहे. मात्र संपूर्ण कर्नाटकात कुरबर समाज विस्तारण्यासाठी अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यात यावे, ११ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कनक जयंतीच्या आत याबाबत निर्णय घेण्यात यावा अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या पत्रकार परिषदेत देण्यात आला.

या पत्रकार परिषदेस माजी वि. प. सदस्य विवेकराव पाटील, लक्ष्मणराव चिंगळे, राजेंद्र सन्नक्की, शंकरगौडा सिद्दलिंग दळवाई, एस एफ पुजारी, अशोक मेटगुड्ड आदी उपस्थित होते.

Tags:

madeppa-tolinavar-demanded-to-add-kuruba-samaj-to-st/