मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि पाटबंधारे विभागाचे मंत्री गोविंदा काराजोळ यांच्याकडून कागवाड तालुक्यातील २३ तलाव भरण्यासाठी २३० कोटींचे विशेष अनुदान मंजूर करून आणल्याबद्दल आमदार श्रीमंत पाटील यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

अनुदान मंजूर करून शुक्रवारी कागवाड मतदार संघात परतलेल्या आमदार श्रीमंत पाटील यांचा राणी चन्नम्मा चौकात भाजप नेत्यांनी ग्रामस्थांच्या वतीने शेतकरी आणि शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत सत्कार केला. राज्याचे मुख्यमंत्री आणि पाटबंधारे मंत्री यांच्याशी चर्चा करून मतदारसंघाच्या विकासासाठी 230 कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल अथणी पीएलडी बँकेच्या अध्यक्ष आणि भाजप नेने शीतल पाटील यांनी आमदारांचे कौतुक केले.
यावेळी बोलताना आमदार श्रीमंत पाटील यांनी कागवाड मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हे आपले ध्येय असल्याचे सांगितले. तालुक्यातील सर्वात मोठा श्री बसवेश्वर खिळेगाव सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचे आपले लक्ष्य असल्याचे आमदारांनी सांगितले. शिवाय येत्या काही दिवसांत हा प्रकल्प पूर्ण होऊन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली त्याचा शुभारंभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सुभाष कठारे, दादा पाटील, रेवांना पाटील, भाजप ब्लॉक अध्यक्ष तम्मण्णा पारशेट्टी, राजेंद्र पोतदार, दादा शिंदे, रामू सोड्डी, रवी नागगोळ, अरुण गणेशवाडी, भारत पाटील, किरण यंदगौडर आदी उपस्थित होते.


Recent Comments