Belagavi

हलालमुक्त दिवाळीसाठी बेळगावात आंदोलन

Share

गेल्या काही काळापासून भारतात ‘हलाल’ उत्पादनांची मागणी होत असून याविरोधात हिंदू जनजागृती समितीने आंदोलन पुकारत यंदाची दिवाळी हलालमुक्त साजरी करण्याचा संकल्प केला आहे.

पूर्वी ‘हलाल’ ही संकल्पना केवळ मांसाहारी उत्पादने आणि मुस्लिम देशांमध्ये निर्यात करण्यापुरती मर्यादित होती. मात्र आता भारतात अनेक उत्पादनात हलाल पद्धतीचा अवलंब केला जात आहे. यावरून राज्यभरात हलालमुक्तीसाठी आंदोलन पुकारण्यात आले होते. आता पुन्हा हलालमुक्तीसाठी हिंदू जनजागृती समिती सरसावली असून आज बेळगावमध्ये हलालमुक्त दिवाळीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

हलाल उत्पादनांच्या विक्रीतून देशातील हिंदू व्यापाऱ्यांची हजारो कोटी रुपयांची उलाढाल होते. हलाल उत्पादनांच्या विक्रीतून जमा होणारे कोटय़वधी रुपये मुस्लीम देश अतिरेकी आणि दहशतवादासाठी वापरत आहेत. सरकारने हलालप्रमाणपत्र देण्याची पद्धत रद्द करावी, अशी मागणी करत यंदाची दिवाळी हलालमुक्त साजरी करण्याचे आवाहन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.

या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना हिंदू जनजागृती समितीच्या नेत्यांनी सांगितले की, हलाल उत्पादनांमुळे भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होत आहे. त्याविरोधात आम्ही पुन्हा जनजागृती सुरू केली असून जनतेने हलाल वस्तू वापरू नयेत. केंद्र सरकारनेही त्यावर पूर्णपणे बंदी घालावी. भारतातील हिंदू कंपन्यांनीही हलाल प्रमाणपत्र घेऊ नये. हलाल आणि जिहादचे समूळ उच्चाटन असा संकल्प ठेवून यंदाची दिवाळी हलालमुक्त साजरी करण्यासाठी आम्ही निर्धार केला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

देशातील १५ टक्के मुस्लिम समाजासाठी ८० टक्के हिंदू समाजावर हलाल उत्पादने लादणे खपवून घेतले जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका हिंदू संघटनांनी घेतली असून त्याचाच एक भाग म्हणून आज बेळगावात हिंदू जनजागृती समितीने आंदोलन छेडले होते. यावेळी हिंदु जनजागृती समितीचे ऋषिकेश गुजर, मारुती सुतार, रवी कोकितकर, मिलन पवार, विजय नंदगडकर, आक्काताई सुतार, रवी करलिंगे आदी उपस्थित होते.

Tags:

belgaum-hindu-jan-jagruti-protest-against-halal/