विजापूर जिल्ह्यात काल रात्री उशिरा झालेल्या मुसळधार पावसाने नदी-नाले, विहिरी भरून वाहत आहेत. नाला भरून वाहात असल्याने चव्हाणभावी-नलतवाड रस्ता संपर्क बंद झाला आहे. विजापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने नागरिक बेहाल झाले आहेत.

पावसामुळे विजापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी समस्या निर्माण झाल्या आहेत. दुथडी भरून वाहणाऱ्या नाल्यामुळे 108 क्रमांकाची रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील चव्हाणभावी गावात घडली. सखल भागातील नाल्यात मुसळधार पावसामुळे पाणी ओसंडून वाहत असल्याने रस्ता संपर्क तुटला आहे. तालिकोटी-चव्हाणभावी-नलतवाड गावचा रस्ता संपर्क बंद झाला आहे.
सकाळपासूनच रस्ता बंद झाल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी त्रास सहन करावा लागला आहे. तालिकोटी-चव्हाणभावी-नलतवाड गावची बस सेवाही बंद झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी त्रास होत असून ग्रामस्थांचे हाल होत आहेत.


Recent Comments